Ad will apear here
Next
१३ डू अँड डोन्टस्
स्पर्धेच्या सध्याच्या युगामध्ये यशासाठी प्रत्येकाचेच प्रयत्न सुरू असतात; मात्र या स्पर्धेमध्ये अपयश आले, तर ती व्यक्ती नैराश्यात अडकून पडण्याची भीती असते. त्यामुळे यशस्वी होण्याच्या दृष्टीने अॅमी मॉरिन यांनी या पुस्तकामध्ये यशाच्या वाटचालीतील निर्णयांच्या १३ टप्प्यांविषयी मार्गदर्शन केले आहे. सचिन रायलवार यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.

थोर व्यक्तींची प्रेरणादायी विधाने आणि छोट्या छोट्या किश्श्यांमधून मूळ मुद्दा उलघडत जात असल्यामुळे त्यांचा सल्ला वाचकांपर्यंत लगेचच पोहोचतो. चुकांमधून शिकणे, संयमाची शक्ती, नाही म्हणण्याची कला, वर्तमानात जगून भविष्याची तयारी, इतरांचे यश साजरे करा, यांवर या पुस्तकामध्ये भर दिला असून, हे मुद्दे आत्मसात करणे ही एक कला आहे, असे लेखकाने स्पष्ट केले आहे.

प्रकाशक :
मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पाने : २५६
किंमत : २२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZRVBJ
Similar Posts
५२ लेसन्स फॉर लाइफ ‘तुम्हाला तुमच्या नशिबाने गोडऐवजी लिंबासारखं आम्ब्वत फळ दिलं, तर तक्रार करू नका. त्या लिंबापासून स्वादिष्ट असं सरबत बनवा आणि तहानेने व्याकूळ झालेल्यांची तहान भागवा’, नेपोलियन हिल यांचा हा संदेश सर्वांनीच कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. ज्युडिथ विडीअमसन यांनी हिल यांनी सांगितलेले जगण्याचे नियम सांगून त्यांचे विश्लेषण केले आहे
दत्त अनुभूती हे आध्यात्मिक अनुभूती देणारे लेखन आहे. आनंद कामत यांनी आपल्याला आलेल्या अनुभूतीवर आधारित हे लेखन केले आहे. ‘लेखनाचे उद्दिष्ट हे फक्त अध्यात्म खरोखरी कळावे आणि प्रत्येकाचा ओढा कुठेतरी योग्य ठिकाणी व्हावा, इतकेच आहे’, असे कामत यांनी मनोगतात नमूद केले आहे. शरीर अजिबात अजिबात साथ देत नसतानाही त्यांनी गिरनारची ११वी फेरी केली
मसूरची संज्योत ‘सामन्यात’ ‘असामान्यत्व’ आढळणारे व्यक्तिमत्त्व असलेले र. वि. उर्फ राघूअण्णा लिमये म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील राजकीय चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांची कन्या आशा लिमये यांनी ‘मसूरची संज्योत’मधून अण्णांचे जीवनचित्रण केले आहे. लिमये यांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा होता. म्हणूनच लेखिकेने
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language